143. विकासाच्या वाटेवरील भारत!

लोक (Population), भूप्रदेश (Territory), शासन (Government) आणि सार्वभौमत्व (Sovereignty) या चार घटकांनी मिळून "देश" अस्तिवात येतो. देशाचं अस्तित्व या चार मूलभूत घटकांवर टिकलेलं असतं. यातील लोक, भूप्रदेश आणि सार्वभौमत्व या तीन घटकांच्या रक्षणाची जबाबदारी शासन पार पाडते.

एखाद्या देशाचा भूप्रदेश सुरक्षित असेल आणि त्या देशाला आपले निर्णय घेण्याचे स्वतंत्र असेल तर अशा देशातील नागरिकांना जीविताच्या अन् स्वातंत्र्याच्या रक्षणाची हमी मिळते. अर्थात देशातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाकडे असते.

मात्र जेव्हा एखादा देश दुसऱ्या एखाद्या देशाशी संघर्षात गुंततो तेव्हा वरील चारही घटक विस्कळीत होतात. या 'संघर्षाने युद्धाचे रूप घेतल्यास' दोन्ही देशातील नागरिक मारले जातात, भूप्रदेश बळकावले जातात, शासन अस्थिर बनते अन् याचा एकंदरीत परिणाम दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वावर होतो.

रशिया-युक्रेन, इस्राईल-पॅलेस्टाईन, भारत-चीन, भारत-पाकिस्तान, इराण-इस्राईल हे अलीकडील काळातील 'द्विपक्षीय संघर्षाची (Bilateral Conflicts)' उदाहरणे आहेत. या द्विपक्षीय संघर्षात इतर देशही समाविष्ट झाल्याने द्विपक्षीय संघर्षाची वाटचाल बहुपक्षीय संघर्षाकडे होताना दिसतेय.

संघर्षाची तीव्रता वाढल्याने आधुनिक शस्त्रे वापरली जाताहेत.
युद्धात 'अण्वस्त्रे (Atomic Warfare)' वापरण्याची शक्यताही डोळ्याआड करता येणारी नाही. या सर्वांचा परिणाम जनसामान्यांवर, जागतिक राजकारणावर आणि जागतिक व्यापारावर होतोय.

प्रत्येक देशातील नागरिक, प्रत्येक देशाचा भूप्रदेश, प्रत्येक देशातील शासन आणि प्रत्येक देशाच सार्वभौमत्व हे चार घटक महत्वाचेच आहेत. यामुळेच या घटकांना तडा पोहोचविणाऱ्या संघर्षांवर तातडीने उपाययोजना कराव्या लागतील..!

~ सचिन विलास बोर्डे

33/4

State | Geopolitics | Global Politics | Bilateral Conflicts | War | Atomic Warfare | Humanity | Politics | International Relations 

Comments

Popular Posts

47. विकासाच्या वाटेवरील भारत!

135. विकासाच्या वाटेवरील भारत!

151. विकासाच्या वाटेवरील भारत!